मुंबई : इटली दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान Narendra Modi आणि इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni यांची भेट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. राजकीय चर्चेपेक्षा या भेटीतल्या एका छोट्याशा गिफ्टने संपूर्ण इंटरनेट वेडं केलं आहे.

PM मोदींनी मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध ‘Melody’ टॉफी गिफ्ट दिली आणि त्यानंतर “Melody” हा शब्द पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. विशेष म्हणजे इटलीच्या PM मेलोनी यांनी स्वतः हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लोकांनी Blinkit, Zepto आणि Instamart वर Melody शोधायला सुरुवात केली आणि काही भागांमध्ये ही टॉफी “Out Of Stock” दिसू लागली.
राजकीय भेटीमध्ये दिलेल्या या छोट्या गिफ्टमुळे इतका मोठा इंटरनेट ट्रेंड तयार होईल, याची कुणालाच कल्पना नव्हती. सोशल मीडियावर “Melodi Moment”, “Best Brand Ambassadors” आणि “Diplomatic Toffee” असे मीम्स व्हायरल झाले. काही युजर्सनी तर “Parle ला यापेक्षा चांगली जाहिरात कधीच मिळणार नाही” अशा प्रतिक्रिया दिल्या.
विशेष म्हणजे या व्हायरल क्षणाचा परिणाम थेट Quick Commerce Apps वरही दिसला. अनेक शहरांमध्ये Melody टॉफी Sold Out दिसू लागली. Blinkit आणि Zepto वर Out Of Stock मेसेज दिसले, सोशल मीडियावर लोकांनी Screenshots शेअर करण्यास सुरुवात केली.
Business Today च्या रिपोर्टनुसार, काही भागांमध्ये Blinkit, Zepto आणि Instamart वर Melody उपलब्धच नाही.
या भेटीमुळे भारत-इटली मैत्रीपेक्षा “Melody” ट्रेंडचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा क्षण “Soft Diplomacy” चं भन्नाट उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.

