भारतीय सैन्या दलाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुणे जिल्ह्यातील एका खासगी कंपनीने तयार केलेल्या रॉकेटची यशस्वी चाचणी पार पडली आहे. Nibe Limited नावाच्या कंपनीच्या ओडिशातील चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) मध्ये ‘सूर्यास्त्र’ (Suryastra) रॉकेट्सचे यशस्वी चाचणी केली आहे. कंपनीने तयार केलेल्या या 150 आणि 300 किलोमीटर रेंज असलेल्या दोन्ही रॉकेट्सची यशस्वी चाचणी पार पडली आहे. भारतीय सैन्याकडून या कंपनीला ही ऑर्डर देण्यात आली होती. त्याचाच हा भाग होता.

पुणे जिल्ह्यात असलेल्या निबे लिमिटेड ( Nibe Limited) नावाच्या या शस्त्र उत्पादक कंपनीला भारतीय सैन्याकडून रॉकेट निर्मितीची ऑर्डर देण्यात आली होती. या कंपनीने सूर्यास्त्र रॉकेट तयार केलं. या रॉकेटची रेंज ही १५० किमी आणि ३०० किमी इतकी आहे. १५० किमी रेंज असलेल्या रॉकेटचा CEP म्हणजे (Circular Error Probable) केवळ १.५ मीटर आणि ३०० किमी रेंज असलेल्या रॉकेटचा CEP केवळ २ मीटर इतकी आहे. हा एक प्रिसीजन गाइडेड रॉकेटचा प्रकार आहे. जमिनीवरून शत्रूच्या ठिकाणी अचूक हल्ला करते. अत्यंच अचूक मारा या रॉकेटमधून करता येतो. ज्यामुळे लहान लहान टार्गेट हे नष्ट करत येतील.
मुळात १.५ ते २ मीटर जर CEP असेल तर तो जगातील सर्वोत्तम रॉकेट सिस्टम्समध्ये गणला जातो. याचा अर्थ असा आहे की, रॉकेट आपल्या लक्ष्यापासून सरासरी फक्त १.५-२ मीटर अंतरावर पडते, जे युद्धात खूप महत्त्वाचे आहे.
ओडिशाच्या ITR चांदीपूर इथं घेतलेल्या या फायरिंग चाचणीमध्ये दोन्ही रॉकेट्सनी आपल्या टार्गेट्सचा अचूकपणे वेध घेतला. या चाचणीत सर्व सिस्टम्स – गाईडन्स, नेव्हिगेशन, प्रोपल्शन आणि कंट्रोल पूर्णपणे यशस्वी होतं.
संरक्षण क्षेत्रात मैलाचा दगड
निबे लिमिटेड ही एक संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रात काम करणारी पुण्यातील कंपनी आहे. या कंपनीने याआधीही अनेक उत्पादनावर काम केलं आहे. आता सूर्यास्तची यशस्वी चाचणी केली आहे. सूर्यास्त रॉकेटच्या यशस्वी चाचणीबद्दल निबे लिमिटेडने प्रतिक्रिया दिली. आजची चाचणीही भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये एक मैलाचा दगड ठरला आहे. हे दोन्ही रॉकेट स्वदेशी बनावटीचे होते. भारतीय सैन्याच्या गरजेनुसार तयार करण्यात आले होते.
चाचणी का महत्त्वाची?
भारतीय सैन्यासाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण, लांब पल्ल्यावर आणि अचूक पण या रॉकेटने हल्ला करता येणार आहे. शत्रूचे तळ, आर्टिलरी पोझिशन्स, कमांड सेंटर्स आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना आता सुर्यास्त रॉकेटने टार्गेट करणे शक्य होईल. सूर्यास्त रॉकेटमुळे आता भारतीय सैन्याची मारक क्षमता ही वाढली आहे. सीमेवर तणाव परिस्थितीमध्ये लांब अंतरावर शत्रूंचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी या रॉकेटची मदत होणार आहे. ३०० किमी रेंजही शत्रू राष्ट्राच्या सीमेमध्ये घुसण्यासाठी मजबूत आहे.view comments

