July 9, 2026
news

माढा, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माढा पश्चिम मंडळाच्या सरचिटणीसपदी सूरज संतोष लिंगे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांनी आदरणीय रणजित भैय्या शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारले.

यावेळी रणजित भैय्या शिंदे तसेच संभाजी पाटील यांच्या हस्ते सूरज लिंगे यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाने दिलेल्या या जबाबदारीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच युवकांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी बोलताना सूरज लिंगे म्हणाले की, “हा सन्मान माझ्यासाठी अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व युवकांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहीन.” तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सूरज लिंगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

-विशाल पाटील (पत्रकार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *