July 5, 2026
Screenshot

Screenshot

प्रतिनिधी । आळेफाटा :- पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जुन्नर तालुक्यातील ओतूर व आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी दौऱ्यात वेळ काढून खामुंडी येथील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.

अत्यंत धावपळीच्या कार्यक्रमातूनही त्यांनी भक्तिभावाने दर्शन घेतल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दर्शनानंतर देवस्थानच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके, सरपंच सत्यवान डुंबरे, पोलीस पाटील किरण भोर, राहुल हांडे, विलास बटवाल, संकेत जोरी, भास्कर शिंगोटे, राजेंद्र वारुळे, अरुण बोडके, नवनाथ शिंगोटे, व्यवस्थापक बबन डुंबरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *