August 24, 2026
a940b8c6-7caa-45d9-87a6-9148438a66a2

अकोले खुर्द : माढा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार श्री. बबनराव शिंदे (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त अकोले खुर्द येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांची शुगर, रक्तदाब (बीपी), नेत्र तपासणी तसेच विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.

या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १२५ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी चेअरमन हरिदास आप्पा पाटील, तालुका पंचायत समिती सदस्य संभाजी पाटील, सरपंच कांतीलाल नाना नवले, माजी संचालक दीपक मामा पाटील, माजी सरपंच महादेव घाडगे, पंडित नाना पाटील, अॅड. रणजित पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक तानाजी जगताप, अनिल पाटील, सागर महाडिक, प्रल्हाद राऊत, महंकाळ शिंदे, नानासो वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी टेंभुर्णी आरोग्य उपकेंद्रातील सर्व डॉक्टर व परिचारिकांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमातून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली.

— विशाल पाटील, पत्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!