August 18, 2026
ChatGPT Image Aug 11, 2026, 10_09_38 PM

पुणे | ११ ऑगस्ट २०२६ : Civic Pride Organizationच्या वतीने संस्थेच्या १० वर्षांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानेसत्यशोधक ते स्वराज्य – फुले वाडा ते रायगड’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ९ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या उपक्रमात संस्थेच्या टीमसह ३० हून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन करत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या सहभागाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

पर्यावरण संवर्धनासाठी सीड बॉल्सचा उपक्रम

या उपक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे सीड बॉल्स (Seed Balls) तयार करून त्यांचा पर्यावरण संवर्धनासाठी वापर करण्याचा उपक्रम. नैसर्गिक पद्धतीने वृक्षनिर्मितीला चालना मिळावी आणि हरित क्षेत्र वाढावे, या उद्देशाने स्वयंसेवकांनी सीड बॉल्सच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

सीड बॉल्सच्या माध्यमातून ‘हरित भारत, स्वच्छ भारत’ या संकल्पनेला चालना देत नागरिकांनी पर्यावरणाच्या संरक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

सामाजिक बांधिलकीचा संदेश

मानवता हाच धर्म’ हा संदेश केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात समाजासाठी एकत्र येणे, शिक्षणातून प्रगती साधणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, सेवाभावी कार्याला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक ऐक्य मजबूत करणे यावर भर देण्यात आला.

Civic Pride Organizationचा सामाजिक सेवेचा प्रवास २०१६ ते २०२६ या कालावधीत दहा वर्षे पूर्ण करत आहे. या दशकपूर्तीच्या निमित्ताने संस्थेने आपल्या सामाजिक कार्याला नव्या दिशेने पुढे नेण्याचा संकल्प केला आहे.

३० हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

या उपक्रमात ३० पेक्षा अधिक स्वयंसेवक आणि Civic Pride Organizationची टीम सहभागी झाली होती. स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेत सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

‘सेवा, समर्पण आणि परिवर्तनाचे!’ या विचारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून इतिहास, सामाजिक विचार, पर्यावरण आणि सेवाभाव यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘चला… सत्यशोधकांच्या विचारांना वंदन करूया, स्वराज्याच्या प्रेरणेतून समाजसेवेची नवी दिशा घडवूया!’ असा संदेश यावेळी देण्यात आला.

— वार्ताविश्व प्रतिनिधी (विशाल पाटील)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!